India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator

गेल्या 5 वर्षातील भारतातील जीवन विमा कंपन्यांचे दाव्याचे प्रमाण

गेल्या 5 वर्षातील अद्यतनित भारतातील जीवन विमा कंपन्यांचे दाव्याचे प्रमाण

By: सचिन तेलवणे | 
Read Time: Less than 1 minute | 
Last Updated: 20-09-2022
गेल्या 5 वर्षातील भारतातील जीवन विमा कंपन्यांचे दाव्याचे प्रमाण

गेल्या 5 वर्षातील भारतातील जीवन विमा कंपन्यांच्या दावा परिपूर्तीचा एकंदरीत कल

जेव्हा ग्राहक जीवन विमा खरेदी करतो तेव्हा परिपूर्तीच्या दाव्याचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक असतो. जीवन विमा योजना घेण्याचा उद्देश दुर्दैवी परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण पुरवणे हा आहे. दाव्याचे प्रमाण तपासणे का महत्त्वाचे आहे ह्याची करणे खालील प्रमाणे आहेत:

  • उच्च दावे परिपूर्ती प्रमाण हे सूचित करते की विमा कंपनीकडून अधिक दावे भरले जात आहेत

  • हे सूचित करते की विमा कंपनीकडे योग्य हमीदारीचे मानक आहेत

  • दावे परिपूर्ती प्रमाण ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करते 

मुदत विमा योजना खरेदी करताना, कंपनीच्या दाव्यांच्या परिपूर्ती प्रमाणाचे विचार करणे अधिक महत्वाचे आहे.
 

दावे परिपूर्ती प्रमाण काय आहे?

दावे परिपूर्ती प्रमाण म्हणजे विमा कंपनीने दिलेल्या दाव्यांच्या संख्येचे प्रमाण आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या दाव्यांच्या संख्येच्या तुलनेत. कंपनीचे हमीदारीचे आणि दाव्यांची प्रक्रिया किती चांगली आहे हे समजून घेण्यासाठी सातत्याने उच्च दावे परिपूर्ती प्रमाण हा एक चांगला निर्देशांक आहे. 

उदाहरणार्थ,

असे गृहीत धरा की कंपनी A ला एका आर्थिक वर्षात 10,000 दावे प्राप्त झाले. त्यापैकी त्यांनी एकूण 9,600 दावे भरले आणि उर्वरित दावे फेटाळले. 

दावे परिपूर्ती प्रमाण = भरलेल्या दाव्यांची संख्या / प्राप्त झालेल्या दाव्यांची संख्या

अशा प्रकारे, आमच्या उदाहरणातील दावा निकाली प्रमाण = 9,600/10,000 = 96% असेल.% 

प्रत्येक आर्थिक वर्षात, विमा कंपन्या त्यांच्या वार्षिक अहवालात दावा दावे परिपूर्ती प्रमाण प्रकाशित करतात. नवीन जीवन विमा योजना खरेदी करताना तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षातील दाव्याचे प्रमाण सूचीबद्ध केले आहे.

कंपनी २०२१-२२ २०२०-२१ २०१९-२० २०१८-१९ २०१७-१८
एलआयसी  ९६.७१ %  ९६.७०% ९६.७०% ९७.७९% ९८.०४%
मॅक्स लाईफ ९९.३४ % ९९.३५% ९९.२२% ९८.७४% ९८.२६%
एचडीएफसी लाइफ ९८.६६ % ९८.०१% ९९.०७% ९७.१५% ९७.८०%
एगॉन लाइफ  ९९.०३ %  ९९.२५% ९८.०१% ९६.४५% ९५.६७%
एसबीआय लाईफ  ९४.५२ % ९४.५२% ९४.५२% ९५.०३% ९६.७६%
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ९७.८० % ९७.९०% ९७.८४% ९८.५८% ९७.८८%
टाटा एआयए लाइफ ९८.५३ % ९८.०२% ९९.०६% ९९.०७% ९८.००%
कॅनरा एचएसबीसी ओबीसी   ९८.५७ % ९८.१२% ९८.१२% ९४.०४% ९५.२२%
आदित्य बिर्ला सन लाइफ  ९८.०८ % ९८.०४% ९७.५४% ९७.१५% ९६.३८%
रिलायन्स निप्पॉन लाइफ  ९८.७० % ९८.४८% ९८.१२% ९७.७१% ९५.१७%
एडलवाईस टोकियो लाइफ  ९८.०९ % ९७.००% ८३.४४% ९५.८२% ९५.२४%
भारती एक्सा लाईफ  ९९.०९ % ९७.३५% ९७.३५% ९७.२८% ९६.८५%
बजाज अलियान्झ लाइफ ९८.४८ % ९८.५०% ९८.०२% ९५.०१% ९२.०४%
कोटक लाईफ  ९८.५० % ९८.५०% ९६.३८% ९७.४०% ९३.७२%
डीएचएफएल प्रमेरिका लाइफ  ९७.०० % ९८.४२% ९८.४२% ९६.८०% ९६.६२%
अविवा लाइफ ९८.४० %  ९८.००% ९७.५३% ९६.०६% ९४.४५%
ऐगस फेडरल  ९६.४७ % ९६.४७% ९६.४७% ९५.७९% ९१.९९%
सहारा इंडिया  ८९.४५ % ८९.४५% ८९.४५% ९०.१६% ८२.७४%
फ्युचर जनराली लाईफ  ९६.१५ % ९४.८६% ९५.२८% ९५.१६% ९३.११%
पीएनबी मेटलाइफ ९८.१७ % ९७.१८% ९७.१८% ९६.२१% ९१.१२%
स्टार युनियन दाई-इची  ९६.६९ % ९६.९६% ९६.९६% ९६.७४% ९२.२६%
इंडिया फर्स्ट  ९६.८१ % ९६.८१% ९६.६५% ९२.८२% ८९.८३%
श्रीराम लाईफ  ९१.६१ % ९१.६१% ९१.६१% ८५.३०% ८०.२३%


 स्रोत: IRDAI आणि विमा कंपन्यांचे संकेतस्थळ

जीवन विमा योजना कंपनीचे उच्च आणि सातत्यपूर्ण दाव्याचे प्रमाण हे सुनिश्चित करते की जीवन विमा योजना खरेदीचा खरा उद्देश पूर्ण झाला आहे.

Read this article in English |  Hindi

सचिन तेलवणे
सचिन तेलवणे हे कंटेंट मॅनेजर आहेत आणि विमा उद्योगाच्या विविध पैलूंवर लिहितात. विमा उद्योगाविषयीच्या त्यांच्या ज्ञानवर्धक अंतर्दृष्टीने वाचकांना विमा योजना खरेदी करताना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मार्गदर्शन करत आहे.

Leave a Comment

Important: Insurance is the subject matter of solicitation | © 2009-2023 MyInsuranceClub.com