India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator

एलआयसी बीमा श्री योजना

 •  views
 •  views

एलआयसी बीमा श्री इंग्रजी मध्ये >

एलआयसी बीमा श्री योजनेचा सारांश

एलआयसी बीमा श्री योजना ही मनी बॅक विमा योजना आहे. या पॉलिसीमध्ये 14, 16, 18 आणि 20 वर्ष विमा कालावधी पर्याय आहेत आणि प्रीमियमचा भरणा विमा कालावधी पेक्षा ४ वर्षे कमी करावयाचा असतो. या योजनेत आपणास गॅरंटीड अ‍ॅडिशन्स आणि लॉयल्टी अ‍ॅडिशन्स मिळतात. ही पोलिसी एक पारंपारिक जीवन विमा पॉलिसी आहे आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी बनवलेली आहे. योजनेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी 4 वर्षांपासुन पॉलीसीधारकास पैसे परत मिळण्यास सुरुवात होते. पुढे काही उदाहरणांच्या मदतीने आपण  ही योजना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ.

 
योजनेचे नाव लाँच तारीख योजनेचे तपशील पोलिसी प्रकार युआयन
एलआयसी बिमा श्री 13 जून, 2018 टेबल क्रमांक 848 मनी बॅक  पोलिसी  512N316V01
 

एलआयसी बीमा श्री पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये

 • मनी बॅक प्लॅन  जो 14 , 16 ,18 आणि  20 वर्षांच्या कालावधीसाठी उपब्लध आहे
 • प्रीमियम केवळ  ( पोलिसी मुदत - ४  वर्ष )  करीता भरावयचे असते  
 • उच्च उत्पन्न  गटातील व्यक्तींसाठी बनवलेली योजना
 • अतिरिक्त प्रीमियम भरून रायडर्सची निवड करण्याचे स्वातंत्र 
  • अपघातीमृत्यू आणि अपंगत्व लाभ राइडर
  • अपघात लाभ राइडर 
  • नवीन टर्म अ‍ॅश्युरन्स राइडर
  • नवीन क्रिटिकल इलनेस ( गंभीर आजार )  लाभ राइडर
  • प्रीमियम वेवर ( माफी ) बेनिफिट राइडर

 


COMPARE THIS PLAN WITH OTHER MONEY BACK PLANS


एलआयसी बीमा श्री पॉलिसीमधील पात्रता अटी

 
  किमान कमाल
विमा रक्कम Rs. 10,00,000 मर्यादा नाही
पॉलिसीची मुदत 14 ,16 ,18  आणि  20 वर्षे 
प्रीमियम पेमेंट टर्म पॉलिसी मुदत -  4 वर्षे
प्रवेश वय 8 वर्षे
(पूर्ण वय)
55 वर्षे - 14 वर्षाच्या मुदतीसाठी
51 वर्षे - 16 वर्षाच्या मुदतीसाठी
48 वर्षे - 18 वर्षाच्या मुदतीसाठी
45 वर्षे - 20 वर्षाच्या मुदतीसाठी
(जवळचे वय)
मॅचुरिटीच्या (परिपक्वतेच्या ) वेळी  वय - 69 वर्षे - 14 वर्षाच्या मुदतीसाठी
67 वर्षे - 16 वर्षाच्या मुदतीसाठी
66 वर्षे - 18 वर्षाच्या मुदतीसाठी
65 वर्षे - 20 वर्षांच्या मुदतीसाठी
(जवळचे वय)
पेमेंट (भरणा)  प्रकार वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही,मासिक

या योजने अंतर्गत वेस्टिंगची (निहित) तारीख: पॉलिसीधारकास १८ वर्षे पूर्ण झाल्या-दिवशी किंवा त्यानंतर लगेच येणाऱ्या योजनेच्या वर्धापनादिवशी योजना आपोआप वेस्ट (निहित) होईल. आणि या वेस्टिंगला एलआयसी आणि पॉलिसीधारकामधील करार मानला जाईल.
 

एलआयसी बीमा श्री योजनेचे लाभ

मृत्यू लाभ - येथे दोन परिस्थिती उद्भवू शकतात
 • योजेनच्या पहिल्या 5  वर्षांत  मृत्यू - नॉमिनीला (नामनिर्देशित व्यक्तीला) “मृत्यू-समयी मिळणारी विमा रक्कम” + तोपर्यंत जमा झालेली “गॅरंटीड अ‍ॅडिशन्स” रक्कम दिली जाईल.
 • योजनेच्या पहिल्या 5  वर्षांत नंतर मृत्यू - नॉमिनीला  ( नामनिर्देशित व्यक्तीला)  “मृत्यू-समयी मिळणारी विमा रक्कम” + तोपर्यंत जमा झालेली “गॅरंटीड अ‍ॅडिशन्स” + लॉयल्टी अ‍ॅडिशन्स (घोषित केली असेल तर)  दिली जाईल.
खालील दिलेल्यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम “मृत्यू-समयी मिळणारी विमा रक्कम” म्हणून ग्राह्य धरली जाईल 
 • वार्षिक प्रीमियमच्या 10 पट
 • मूलभूत विमा रकमेच्या  125 % 
 • मॅच्युरिटीच्या वेळी  मिळणारी विमा रक्कम  जी पुढील प्रमाणे असेल:
  • 14 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी मूलभूत विमा रकमेच्या 40%
  • 16 वर्षाच्या पॉलिसी मुदतीसाठी मूलभूत विमा रकमेच्या 30%
  • 18 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी मूलभूत विमा  रकमेच्या 20%
  • 20 वर्षाच्या पॉलिसी मुदतीसाठी मूलभूत विमा रकमेच्या 10%
मृत्यू-समयी मिळणारी विमा रक्कम नेहमी आतापर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या किमान 105% असेल. यात  प्रीमियममध्ये कर घटक समाविष्ट नाहीत.

गॅरंटीड अ‍ॅडिशन्स खालील प्रमाणे:
 • पहिल्या ५ वर्षाच्या कालावधीत - प्रत्येक रु .1000 मूलभूत विमा रक्कमेमागे रु. 50
 • पॉलिसीची  5  वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रीमियम भरण्याची मुदत पूर्ण होईपर्यंत - प्रत्येक रु. 1000 मूलभूत विमा रक्कमेमागे रु.  55
 लॉयल्टी अ‍ॅडिशन्स बद्दल आगाऊ माहिती दिली जात नाही.  एलआयसी दरवर्षी हे जाहीर करते

सर्व्हायव्हल बेनिफिट - पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मुर्त्यू न झाल्यास पॉलिसीधारकास खालील गोष्टी मिळतील
 • १४ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी  -10 व्या आणि 12 व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीस मूलभूत रकमेच्या 30%
 • १६ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी  - 12 व्या आणि 14 व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीस मूलभूत रकमेच्या 35% रक्कम
 • १८ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - 14 व्या आणि 16 व्या पॉलिसी वर्षाच्या अखेरीस मूलभूत रकमेच्या 40%
 • २० वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - 16 व्या आणि 18 व्या पॉलिसी वर्षाच्या शेवटी बेसिक रकमेच्या 45% रक्कम,
पॉलिसी मुदत संपेपर्यंत चालू राहते, ज्या वेळी तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट मिळते.

मॅच्युरिटी बेनिफिट - पॉलिसीची मुदत संपल्यावर पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मुदतीनुसार खालील लाभ मिळतीलः
 • १४ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - मूलभूत विमा  रकमेच्या 40%
 • १६ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - मूलभूत विमा रकमेच्या 30%
 • १८ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - मूलभूत विमा रकमेच्या 20%
 • २० वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी - मूलभूत विमा रकमेच्या 10%

दरवर्षी जमा झालेल्या गॅरंटीड अ‍ॅडिशन्स आणि लॉयल्टी अ‍ॅडिशन्स देखील  मॅच्युरिटीवर  (परिपक्वतेवर) दिले जातील. 

आयकर लाभ - कलम ८०सी अंतर्गत दरवर्षी करपात्र उत्पन्नामधून जीवन विमा हप्त्यासाठी भरलेली  १,५०,००० रुपये वजावट म्हणून करण्यास परवानगी आहे. तुम्हाला या योजनेतून लाभ प्राप्त झालेली मॅच्युरिटी रक्कम कलम १०(१०डी ) अंतर्गत करमुक्त आहे. हि आयकर सूट वेळोवेळी बदलली जाऊ शकते.

कर्ज - एकदा आपल्या पॉलिसीने सरेंडर व्हॅल्यू मिळविल्यानंतर आपण कर्ज मिळवू शकता.  प्रीमियम २ वर्षे  भरल्या नंतर  सरेंडर व्हॅल्यू मिळते. सध्या व्याज दर वार्षिक 9.5% आहे. हा व्याजदर वेळोवेळी बदलू शकतो. कर्जाची रक्कम योजनेच्या  सरेंडर व्हॅल्यूवर (आत्मसमर्पण मूल्यावर) अवलंबून असते:
 • जर पॉलिसी अमलात असेल तर -सरेंडर व्हॅल्यूच्या 90% 
 • पेड-अप पॉलिसींसाठी - सरेंडर व्हॅल्यूच्या 80%
 

एलआयसी बीमा श्री योजनेचे अतिरिक्त फायदे आणि वैशिष्ट्ये

रायडर्स - आपण या योजनेतील 5 रायडर्स च्या यादीतून निवड करू शकता. हे रायडर्स वाढीव फायदे व पर्याय देतात. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रीमियम द्यावे लागेल. कृपया राइडर बेनिफिटचा पर्याय निवडण्यापूर्वी त्याचा तपशील जाणून घ्या. राइडर तपशील संक्षिप्तात खालीलप्रमाणे आहे:
 • अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ राइडर - अपघातामुळे मृत्यू झाल्यास, अपघाती मृत्यू लाभ राइडरची विमा रक्कम योजनेच्या मूलभूत रकमेसह दिली जाईल. अपघातामुळे अपंगत्व उद्भवल्यास (अपघाताच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत) अपघाती मृत्यू लाभ राईडरची विमा रक्कम पुढील 10 वर्षासाठी मासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. याव्यतिरिक्त अपघाती मृत्यू लाभ राईडरसाठीचे भावी प्रीमियम तसेच त्याच्या विमा रकमेएवढ्या मूलभूत विमा रकमेच्या भागासाठी पुढील प्रीमियम माफ केले जाईल.
 • अपघात बेनिफिट राइडर - अपघातामुळे मृत्यू झाल्यास, अपघात बेनिफिट रायडरच्या विमा रकमेसह योजनेची मूलभूत विमा रक्कम दिली जाईल.
 • नवीन टर्म अ‍ॅश्युरन्स राइडररायडर - या रायडर अंतर्गत निवडलेली विमा रक्कम मूलभूत विमा रकमेसह दिली जाईल.
 • नवीन गंभीर आजार बेनिफिट राइडर - या रायडरमध्ये समाविष्ट असलेल्या १५ गंभीर आजारांपैकी कोणत्याही आजाराच्या पहिल्या निदानानंतर, निवडलेली विमा रक्कम पॉलिसीधारकास दिली जाईल.
 • प्रीमियम वेव्हर बेनिफिट राइडर - जेव्हा जीवन विमा उतरवलेली व्यक्ती १८ वर्षांपेक्षा लहान असते तेव्हा योजना प्रस्तावित करणारा व्यक्ती हा पर्याय निवडू शकतो. प्रस्तावित करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, भविष्यातील प्रीमियम माफ केले जाते. 
 
ग्रेस पीरियड - वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि तिमाही प्रीमियम भरणा पर्यायामध्ये, प्रीमियम देय तारखेनंतर आपल्याकडे 30 दिवसांचा कालावधी असेल. मासिक प्रीमियम भरणा पर्यायामध्ये, अतिरिक्त कालावधी 15 दिवस असेल.

सर्व्हायव्हल लाभ घेणे पुढे ढकलण्याचा पर्याय - सर्व्हायव्हल लाभ जेव्हा देय असेल तेव्हा ते न घेण्याचे पर्याय निवडू शकता. आपण पॉलिसी मुदतीदरम्यान कधीही किंवा मॅच्युरिटी लाभासह ते घेण्याचे निवडू शकता. तुम्हाला यासाठी व्याज देण्यात येईल. व्याज दर 5 वर्षाचा जी-सेक दर वजा 150 बीपीएस असेल. सध्या हा दर प्रति-वर्षी अंदाजे 6.5% होईल. हे अधिक समजून घेण्यासाठी एलआयसी कार्यालयात संपर्क साधावा.  

हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी लाभ घेण्याचा पर्याय - याला सेटलमेंट ऑप्शन देखील म्हणतात. आपण मॅच्युरिटी लाभ रक्कम 5, 10 किंवा 15 वर्षांमध्ये घेऊ शकता. आपण वार्षिक, अर्ध-वार्षिक, तिमाही किंवा मासिक पर्याय निवडू शकता. तुम्हाला याकरिता व्याज दिले जाईल. दिले जाणारे व्याज दर जाणून घेण्यासाठी आपण एलआयसी कार्यालयात संपर्क साधावा.

हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ घेण्याचा पर्याय - हा पर्याय निवडल्यास, आपण मृत्यू लाभ रक्कम 5, 10 किंवा 15 वर्षे घेऊ शकता. आपण वार्षिक, अर्ध-वार्षिक, तिमाही किंवा मासिक पर्याय निवडू शकता. तुम्हाला याकरिता व्याज दिले जाईल. दिले जाणारे व्याज दर जाणून घेण्यासाठी आपण एलआयसी कार्यालयात संपर्क साधावा.

सरेंडर मूल्य - प्रीमियमचा 2 वर्षे भरणा केल्यानंतर ही योजना सरेंडर केली जाऊ शकते. योजनेत गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यू देण्यात येतात. सरेंडर करण्याच्या वेळी एलआयसी कार्यालयात संपर्क साधल्यावरच विशेष सरेंडर मूल्य जाणून घेता येते. यात गॅरंटीड अ‍ॅडिशन्स देखील सरेंडर व्हॅल्यू मिळवतात. 

एलआयसी बीमा श्री योजनेच्या आत्मसमर्पण मूल्याचे अधिक तपशील
 

एलआयसी बीमा श्री योजनेचे स्पष्टीकरण

काही उदाहरणांच्या मदतीने आपण या योजनेला अधिक चांगले समजू या.

समजा भावेश जो 30 वर्षांचा आहे त्याने ही योजना घेतली.

मूलभूत विमा रक्कम - रु. १०,००,०००
पॉलिसी मुदत - २० वर्षे
प्रीमियम भरणा मुदत - १६ वर्षे
वार्षिक प्रीमियम - रु. 1,08,584 + कर

परिस्थिती 1 - भावेश योजना खरेदी केल्यानंतर  3 वर्षाने मरण पावला.

मृत्यू लाभ म्हणून त्याच्या नॉमिनीला खाली दिलेल्या पैकी जे जास्त असेल ते “मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम” + “गॅरंटीड अ‍ॅडिशन्स” म्हणून मिळेल

मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम खालील पैकी जे जास्त असेल ते:
 • 10 पट वार्षिक प्रीमियम = 10 x 1,08,584 = रु.10,85,840 
 • मूलभूत विमा रकमेच्या 125% = 125% x 10,00,000 = रु. 12,50,000
 • मूलभूत विमा रकमेच्या 10% = 10% x 10,00,000 = रु. १,००,०००
गॅरंटीड अ‍ॅडिशन्स - प्रत्येकी १,००० रु. मूलभूत विमा रकमेसाठी रु. ५०, ३ वर्षांसाठी = ३ x ५०,००० = रु. १,५०,०००

अश्या रितीने नामनिर्देशित व्यक्तीला रु. 12,50,000 + रु. 1,50,000 = रु. 14,00,000 मिळतील व पॉलिसी संपुष्टात येईल. 

परिस्थिती २ - भावेश यांचा मृत्यू ७ वर्ष प्रीमियम भरल्यानंतर होतो

मृत्यू लाभ म्हणून त्याच्या नॉमिनीला खाली दिलेल्या पैकी जे जास्त असेल ते “मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम” + “गॅरंटीड अ‍ॅडिशन्स” + “लॉयल्टी अ‍ॅडिशन्स” म्हणून मिळेल

मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम खालील पैकी जे जास्त असेल ते:
 • 10 पट वार्षिक प्रीमियम = 10 x 1,08,584 = रु.10,85,840 
 • मूलभूत विमा रकमेच्या 125% = 125% x 10,00,000 = रु. 12,50,000
 • मूलभूत विमा रकमेच्या 10% = 10% x 10,00,000 = रु. १,००,०००

गॅरंटीड अ‍ॅडिशन्स - 
पहिल्या 5 वर्षांसाठी - प्रत्येकी १,००० रु. मूलभूत विमा रकमेसाठी रु. ५० = ५ x ५०,००० = रु. २,५०,०००
६व्या व ७ व्या वर्षासाठी - प्रत्येकी १,००० रु. मूलभूत विमा रकमेसाठी रु. ५५ = २ x ५५,००० = रु. १,१०,०००

अशा रीतीने नामनिर्देशित व्यक्तीला रु. 12,50,000 + रु. 2,50,000 + 1,10,000 = रु. 16,10,000 + लॉयल्टी अ‍ॅडिशन्स जर घोषित केलेलं असेल तर मिळेल व पॉलिसी संपुष्टात येईल.

परिस्थिती 3 - भावेश यांचा मृत्यू १७ वर्ष प्रीमियम भरल्यानंतर होतो

भावेश सर्व्हायव्हल लाभाचा पहिला हप्ता प्राप्त करण्यास पात्र असेल. याव्यतिरिक्त, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला मृत्यू लाभही मिळेल.

सर्व्हायव्हल लाभ - भावेशला हे 16 व्या वर्षा नंतर मिळेल.
 • मूळ विमाराशीच्या 45% = रू .45% 10,00,000 = रु.4,50,000
मृत्यू लाभ म्हणून त्याच्या नॉमिनीला खाली दिलेल्या पैकी जे जास्त असेल ते “मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम” + “गॅरंटीड अ‍ॅडिशन्स” + “लॉयल्टी अ‍ॅडिशन्स” म्हणून मिळेल

मृत्यूसमयी मिळणारी विमा रक्कम खालील पैकी जे जास्त असेल ते:
 • 10 पट वार्षिक प्रीमियम = 10 x 1,08,584 = रु.10,85,840 
 • मूलभूत विमा रकमेच्या 125% = 125% x 10,00,000 = रु. 12,50,000
 • मूलभूत विमा रकमेच्या 10% = 10% x 10,00,000 = रु. १,००,०००

गॅरंटीड अ‍ॅडिशन्स - 
पहिल्या 5 वर्षांसाठी - प्रत्येकी १,००० रु. मूलभूत विमा रकमेसाठी रु. ५० = ५ x ५०,००० = रु. २,५०,०००
उर्वरित १२ वर्षांसाठी  - प्रत्येकी १,००० रु. मूलभूत विमा रकमेसाठी रु. ५५ = १२ x ५५,००० = रु. ६,६०,०००

अशा रीतीने नामनिर्देशित व्यक्तीला रु. 12,50,000 + रु. 2,50,000 + ६,६0,000 = रु. २१,६0,000 + लॉयल्टी अ‍ॅडिशन्स जर घोषित केलेलं असेल तर मिळेल व पॉलिसी संपुष्टात येईल.

परिस्थिती 4 - पॉलिसी मुदतीदरम्यान भावेश यांचा मृत्यू होत नाही.

भावेशला सर्व्हायव्हल लाभ आणि मॅच्युरिटी लाभ मिळतील.

१६ वर्षानंतर मिळणारा सर्व्हायव्हल लाभ = मूलभूत विमा रकमेच्या 45% = रु. 10,00,000 = रु. 4,50,000.

१८ वर्षानंतर मिळणारा सर्व्हायव्हल लाभ = मूलभूत विमा रकमेच्या 45% = रु. 10,00,000 = रु. 4,50,000.

मॅच्युरिटी बेनिफिट = मूलभूत विमा रकमेच्या १०% + गॅरंटीड अ‍ॅडिशन्स + अजून काही अंतिम रक्कम असेल तर

मूलभूत विमा रकमेच्या  10% = 10% x 10,00,000 = रु.१,००,००० ची
पहिल्या ५ वर्षांसाठी गॅरंटीड अ‍ॅडिशन्स = ५ रु. 50,000 = रु.2,50,000
6 व्या ते 20 व्या वर्षांसाठी गॅरंटीड अ‍ॅडिशन्स = 15 x रु. 55,000 = रु. ८,२५,०००

अशारितीने भावेशला पॉलिसी मुदतीनंतर 11,75,000 रु. मिळतील आणि पॉलिसी संपुष्टात येईल. 

मला आशा आहे की या उदाहरणाद्वारे आपल्याला ही योजना खरोखर चांगल्या प्रकारे समजण्यात मदत झाली असेल. कृपया कोणतीही योजना विकत घेण्यापूर्वी ती योजना नीट समजून घ्या - एकदा आपण ती घेतल्या नंतर बंद करताना भारी किंमत मोजावी लागू शकते. आपल्याला या योजनेबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया खाली प्रश्न विचारा, आम्ही आपल्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

एलआयसी बीमा श्री इंग्रजी मध्ये > | एलआयसी बीमा श्री हिंदी मध्ये >
 
Compare MoneyBack Plans

Leave a Comment

Money Back Plan Calculator
Important: Insurance is the subject matter of solicitation | © 2009-2021 MyInsuranceClub.com