India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator

एलआयसी जीवन उमंग योजना

 •  views
 •  views

एलआयसी जीवन उमंग योजनेचा सारांश – टेबल नं ८४५

एलआयसी जीवन उमंग योजनाही एक फक़्त एन्डॉवमेंट योजना नसून संपूर्ण जीवन योजना आहे जी तुम्ही हयात असेपर्यंत प्रीमियम देय टर्मच्या अखेरपर्यंत नियमित पेआउट देते. ही योजना एक सहभागी योजना असून ती सरळ प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम संवर्धन बोनससाठी पात्र आहे.
 
उद्घाटन दिनांक टेबल नं. उत्पादन प्रकार बोनस युआन
२० एप्रिल २०१७ ८४५ एन्डॉवमेंट+ संपूर्ण जीवन हो 512N312V01
 

एलआयसी जीवन उमंग योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

 • ही एक फक़्त एन्डॉवमेंट योजना नसून संपूर्ण जीवन योजना आहे.
 • जोपर्यंत तुम्हीहयात आहात किंवा तुमच्या 100 वर्षांपर्यंतप्रिमियम भरणा टर्मनंतर 8% सम अॅश्युअर्ड देते.
 • ही योजना सरळ प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम संवर्धन बोनसप्रदानकरते.
 • प्रीमियमवरील कर लाभ, मृत्यूलाभ आणि मुदतपुर्तीचा लाभ या योजनेत मिळतो.
 

एलआयसी जीवन उमंग योजनेचे फायदे

खाली दिलेले एलआयसी जीवन उमांग योजनेचे फायदे आहेत.

मृत्यूलाभ
 • जर का पॉलिसीधारकाचा मृत्यू रिस्क कमेंसमेंटच्या तारखेपूर्वी झाल्यासभरलेले सर्व प्रीमियम्स नॉमिनीला परत दिले जातील.
 • जर का पॉलिसीधारकाचा मृत्यू रिस्क कमेंसमेंटच्या तारखेनंतर झाल्यासनॉमिनीला मृत्यूवर विमाराशी मिळेल.

मृत्यु वरील सम अॅश्युअर्ड खालीलपैकी सर्वाधिक आहे.
 • वार्षिक प्रीमियमसाठी 10 पट.
 • बेसिक सम अॅश्युअर्ड + सरळ प्रत्यावर्ती बोनस + अंतिम वाढीव बोनस.

डेथ बेनिफिट कधीही भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 105% पेक्षा कमी होणार नाही.

डेथ बेनिफिटमध्ये उल्लेख केलेल्या प्रीमियम्समध्ये कर, रायडर प्रीमियम आणि अंडरराइटिंग निर्णयांमुळे वाढीव प्रीमियम समाविष्ट होत नाही.

या योजनेत रिस्क कमेंसमेंटची तारीख कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी क्लीक करा.


सर्व्हायव्हल बेनिफीट

प्रीमियम देय टर्मनंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारक दर वर्षी मूळ सम अॅश्युअर्डच्या 8% प्राप्त करण्यास प्रारंभ करेल. पॉलिसीधारक हयात असेपर्यंत किंवा त्याच्या १०० वर्षे वयापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत ही रक्कम देय असेल.


मॅच्युरिटी बेनिफिट

वयाची 100 गाठत असताना, पॉलिसीधारकाला समअॅश्युअर्ड + सरळ प्रत्यावर्ती बोनस + अंतिम वाढ बोनस मिळतो.


कर्ज सुविधा

एकदा कि सरेंडर मूल्य प्राप्त झाले कीआपण या पॉलिसीवर कर्ज मिळण्यास पात्र असाल. ३ वर्षाचे संपूर्ण प्रीमियम्स भरल्यानंतरच या योजनेत सरेंडर मूल्य प्राप्त होते.कर्जाची रक्कम आणि व्याजदर हे कर्ज घेताना जो रेट/दर असेल त्यावर अवलंबून असेल.
 

एलआयसी जीवन उमांग योजनेचे उदाहरण

ही योजना एका उदाहरणासह समजावून घेऊ.

समजा, गौरव हा एक ३५ वर्षांचा मुलगा खालीलघटकांप्रमाणे ही योजना खरेदी करतो.

विमा राशी = रु. ५,००,०००
पॉलिसी मुदत= १००–पॉलिसी प्रवेशाचे वय = १०० – ३५ = ६५ वर्षे
प्रीमियम्स भरण्याची मुदत = २० वर्षे

या आधारे, वार्षिक प्रीमियम रु. २६,१०५/- + कर असा असेल.

योजना खरेदी करतेवेळी त्याचे वय ८ वर्षांनी जास्त असल्यामुळे रिस्क कवर तत्काळ सुरु होईल.


प्रसंग १: प्रीमियमची 7 वर्षं संपल्यानंतर/पूर्णझाल्यानंतर गौरवचा मृत्यू झाला.

खालीलपैकी जे जास्त असेल त्यावर त्याच्या नामनिर्देशित / नॉमिनीस मृत्य लाभ / डेथ बेनिफिट मिळेल.
 • वार्षिकप्रीमियम च्या १० पट = रु. २,६०,१०५ /-
 • मूलभूत सम अॅश्युअर्ड + सरळ प्रत्यावर्ती बोनस + अंतिम वाढ बोनस = रु. ५,००,०००+ सरळ प्रत्यावर्ती बोनस + अंतिम वाढ बोनस.
खर तर,त्याचे नॉमिनीला असेच लाभ मिळेल जेप्रीमियम देय टर्म करण्यापूर्वीजर का गौरव कधीही मरण पावलाअसता तर जे त्याला मिळाले असते.प्रसंग २: प्लॅन घेतल्याच्या 22 वर्षांनंतर गौरवचा मृत्यू झाला आणि सर्व 20 प्रीमियम्स भरले आहेत.

20 वर्षांचे त्याचे प्रीमियमचे भुगतान संपले असल्याने,तो सर्व्हायवल बेनिफिटसाठी पात्र असेलत्या नंतर प्रत्येक वर्षी खालीलप्रमाणे :
 • 20 व्या प्रीमियमची पूर्तता केल्याच्या १ वर्षा नंतर = सम अॅश्युअर्डच्या ८% = रु. ५,००,००० वर ८% = रु. ४०,०००
 • 20 व्या प्रीमियमची पूर्तता केल्याच्या 2 वर्षांनंतर = सम अॅश्युअर्डच्या ८% =  रु. ५,००,००० वर ८% = रु. ४०,०००
खालीलपैकी जे जास्त असेल ते त्याच्या नॉमिनीस/नामनिर्देशित  व्यक्तीस डेथ बेनिफिट मिळेल :
 • वार्षिक प्रीमियमसाठी १० पट = रु. २,६०,१०५.
 • बेसिक सम अॅश्युअर्ड + सरळ प्रत्यावर्ती बोनस+ अंतिम वाढ बोनस = रु. ५,००,००० + सरळ प्रत्यावर्ती बोनस + अंतिम वाढ बोनस.
टीप: प्रीमियम भरण्याच्यामुदतीनंतर आता त्या प्रत्येक वर्षासाठी जोवर गौरव हयात आहे, तोवरत्याला मूळ सम अॅश्युअर्डच्या ८% रक्कम मिळेल. तो १०० वर्षाचा होईपर्यंत किंवा त्याच्या मृत्युपर्यंत त्याला ही रक्कम मिळेल४०,०००, जे काही आधी असेल ते.

तसेच, जर प्रीमियम देय टर्मच्या नंतर गौरवाने मृत्यू पावला तर त्याचे नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळेल आणि पॉलिसी संपुष्टात येईल.


प्रसंग ३: गौरव वयाच्या १०० वर्षापर्यंत हयात असल्यास.

20 वर्षांच्या मुदतीनंतर प्रीमियमची मुदत पूर्ण झाल्यानंतर दरवर्षीत्याला सर्व्हायवल बेनिफिट रु. ४०,००० मिळेल.

तो मॅच्युरिटी बेनिफिटसाठीही पात्र आहे जे = विमा राशी + सरळ प्रत्यावर्ती बोनस+ अंतिम वाढ बोनस
 

एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे अन्य पर्यायी लाभ

अतिरिक्त प्रिमियम भरून खालील रायडर्स घेता येतात:
 • अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ.
 • अपघात लाभ रायडर
 • न्यू टर्म अॅश्युरन्स राइडर
 • नवीन गंभीर आजार बेनिफिट राइडर
 

एलआयसी जीवन उमंग पॉलिसीची पात्रता अट

 
  किमान कमाल
विमाराशी रु. १,००,००० मर्यादा नाही
प्रीमियम पेमेंट टर्म १५, २०, २५, आणि ३० वर्षे
पॉलिसीची मुदत १०० – प्रवेशाचे वय
प्रवेशाचे वय ९० दिवस ५५ वर्षे
प्रीमियम देय टर्मच्या समाप्तीनुसार वय ३० वर्षे ७० वर्षे
प्रीमियम पेमेंट मोड वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक
 

एलआयसी जीवन उमंगमधील अन्य अटी

पॉलिसीचे पुनरुज्जीवन

वाढीव कालावधी नंतरसुद्धाजर काप्रीमियम्स वेळेवर भरले गेले नाहीत, तर पॉलिसी समाप्त होईल. समाप्त झालेलीपॉलिसी 2 सलग वर्षांच्या कालावधीत पुनरुज्जीवित केले जाऊ शकते, पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून परंतु मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी. एलआयसीने निश्चित केलेल्या दराने व्याज (अर्धवार्षिक चक्रवाढ करून) सर्व देय प्रीमियम भरणे आवश्यक आहे.

पेड अप मूल्य

जर तीन वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरला असेल आणि पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले गेले नसेल तर, पॉलिसी अंतर्गत सर्व फायदे सवलत कालावधीच्या समाप्ती नंतर थांबतील आणि काहीही देय असणार नाही. जर किमान तीन पूर्ण वर्षांचे प्रीमियम्स भरले गेले असतील आणि त्यानंतरच्या प्रीममयमचे योग्य रितीने पेमेंट न केल्यास पॉलिसी निरर्थक नाही परंतु पॉलिसी टर्मच्या समाप्ती पर्यंत पेड-अप पॉलिसी म्हणून पुढे चालू राहील.

पेड-अप पॉलिसीअंतर्गत मृत्यूवर विमाराशीची बेरीज जी कमी होईल तिला आपण "मृत्यू पेड-अप सम अॅश्युअर्ड" असे म्हणू आणि [(देय झालेल्या प्रीमियम्सची संख्या / देय प्रीमियमची संख्या)* मृत्यूवर विमा राशी या समान असेल.

पेड-अप पॉलिसीअंतर्गत मॅच्युरिटीवर विमाराशीची बेरीज जी कमी होईल तिला आपण "मॅच्युरिटी पेड-अप सम अॅश्युअर्ड" असे म्हणू आणि [(देय झालेल्या प्रीमियम्सची संख्या / देय प्रीमियमची संख्या)* मॅच्युरिटी विमा राशी या समान असेल.

पॉलिसीचे समर्पण / सरेंडर

किमान तीन सलग वर्षे प्रीमियम दिले असल्यास, पॉलिसी कोणत्याही वेळी समप्रेरित केली जाऊ शकते. पॉलिसी परत केल्यावर, एलआयसी गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यूचे पैसे देईल आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यूपेक्षा सरेंडर व्हॅल्यू  जास्त देईल.

विशेष सरेंडर मूल्य पुनरावलोकनात्मक आहे आणि IRDAI ची पूर्व मान्यतेनुसार वेळोवेळी ते विमा कंपनीद्वारे निश्चित केले जाईल. 

पॉलिसी टर्ममध्ये देय असणा-या गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या समान असेल भरलेल्या एकूण प्रीमियम्सवर लागू असलेला गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यूद्वारे घटक ही गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू घटक म्हणून व्यक्त केले जातात कारण टक्केवारी ही पॉलिसी टर्म आणि पॉलिसी वर्गावर अवलंबून असते ज्यामध्ये पॉलिसी समपर्ण आहे.

फ्री लूक पिरियड

जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या "अटी व शर्ती" च्या बाबतीत समाधानी नसल्यास पॉलिसी बाँड मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत, आक्षेपांचे कारण सांगणारी पॉलिसी एलआयसीकडे परत केली जाऊ शकते. त्याच एलआयसी मिळाल्यानंतर पॉलिसी रद्द केली जाईल आणि जमा झालेल्या प्रीमियमची रक्कम (बेस प्लॅन आणि राइडर असल्यास) कव्हर आणि स्टँप ड्युटी शुल्कासाठी प्रमाणित जोखीम प्रीमियमची कपात केल्यानंतर परत केली जातेRead Review of  LIC Jeevan Umang in English >  |  LIC Jeevan Umang in Hindi >

 

Leave a Comment

Important: Insurance is the subject matter of solicitation | © 2009-2022 MyInsuranceClub.com