India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator

एलआयसी जीवन अमर योजना

 •  views
 •  views

 

LIC Jeevan Amar Plan in English >

एलआयसी जीवन अमर योजना - टेबल क्र. 855

एलआयसीची नुकतीच बाजारात आलेली जीवन अमर योजना ही एक  प्युअर टर्म  विमा योजना आहे. टर्म ईन्शुरन्स  योजना असल्याने आपणास अत्यंत परवडणार्‍या प्रीमियममध्ये मोठया प्रमाणात विमा संरक्षण देते आणि म्हणूनच पॉलिसीधारकास सर्वोत्तम स्वरूपात आर्थिक संरक्षण मिळते. ही योजना ऑफलाइन (शाखांद्वारे) विक्री केली जाईल आणि  ही योजना याआधी उपलब्ध असलेल्या एलआयसी अमूल्य जीवन  II   या  योजनेच्या  तुलनेत  अधिक स्वस्त दरात उपलब्ध आहे .  या योजनेत अमूल्य जीवन II च्या तुलनेत पुरेशी फ्लेक्सिबिलिटी (लवचिकता )आहे.
 

लाँच  तारीख  6 ऑगस्ट, 2019
योजना तपशील टेबल  क्र. 855
पोलिसी प्रकार टर्म इन्शुरन्स


एलआयसी जीवन अमर पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये

 
 • विमा रक्कम निवडण्यासाठी 2 पर्याय
  • समान विमा रक्कम 
  • वाढती विमा रक्कम
 • वयाच्या  ८० वर्षापर्यंत पॉलिसी घेण्याची मुभा
 • डेथ बेनिफिट पेआऊट निवडण्याचे पर्याय
  • एकरकमी 
  • 5,10 किंवा 15 वर्ष हप्त्यांमध्ये
 • प्रीमियम किती वर्षे द्यायचे याची निवड करण्याची मुभा
  • सिंगल प्रीमियम
  • नियमित प्रीमियम
  • मर्यादित प्रीमियम
 • अपघात मृत्यू लाभ राइडर उपलब्ध
 • धूम्रपान न करणाऱ्यांसाठी कमी प्रीमियम दर 
 • महिलांसाठी कमी प्रीमियम दर
 • आयकरात सूट 
चला या योजनेबद्दल अधिक तपशील समजून घेऊया.
 

एलआयसी जीवन अमर कसे कार्य करते?

विमा रकमेची निवड - खरेदीच्या वेळी आपल्याकडे खालील-पैकी पर्याय निवडण्याची सोय आहे.
 • समान विमा रक्कम - या पर्यायात विमा रक्कम संपूर्ण पॉलिसी अवधी मध्ये समान राहील. 
 • वाढती विमा रक्कम - या पर्यायात विमा रक्कम पॉलिसीच्या अवधीसह वाढत राहील. पहिल्या 5 वर्षात विमा रकमेमध्ये कोणताही बदल होणार नाही. याला बेसिक सम अ‍ॅश्युअर्ड (बीएसए) म्हटले जाईल. पुढील 15 वर्षांत किंवा पॉलिसी अवधी संपल्यावर (जे आधी असेल ते ) बीएसएच्या रकमेमध्ये दरवर्षी 10% वाढ होईल. त्यानंतर, विमा रक्कम वाढणार नाही. वाढीव विमा रक्कम बेसिक विमा रकमेच्या जास्तीत जास्त दोन पट वाढविली जाईल. 
प्रीमियम भरणा  - आपण आपल्या सोयीनुसार खालील दिलेल्या पर्यायानुसार प्रीमियम भरू शकता
 • सिंगल प्रीमियम - फक्त एकदाच पैसे द्या आणि भविष्यातील कोणत्याही भरण्याची चिंता न करता पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत विमा संरक्षणाचा आनंद घ्या. ज्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नाही आहे आणि ज्यांना आता पैसे मिळाले आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे . 
 • रेग्युलर प्रीमियम - या पर्यायामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या संपूर्ण अवधी साठी दरवर्षी पैसे द्यावे लागतात. जर आपण 80 वर्षांच्या वयापर्यंत विमा अवधी निवडला असेल तर आपल्याला त्या वेळेपर्यंत प्रीमियम भरावे लागेल.
 • मर्यादित प्रीमियम - हा पर्याय जास्त विमा अवधीच्या पर्यायांमुळे अधिक लोकप्रिय झाला आहे. ज्यांना त्यांच्या मिळकतीच्या काळात  किंवा त्या नंतर लगेच प्रीमियम भरणे समाप्त करायचे आहे आणि संपूर्ण अवधीसाठी विमा संरक्षणाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा पर्याय सर्वोत्कृष्ट आहे . तुम्ही प्रीमियम भरण्याचा अवधी खालीलप्रमाणे निवडू शकता
  • पॉलिसीचा अवधी वजा 5 वर्षे
  • पॉलिसीचा अवधी वजा 10 वर्षे
 
डेथ बेनिफिट पेआउट - आपण नामनिर्देशित (नॉमिनी) व्यक्तीला एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये देय रकमेचा लाभ देऊ शकता.
 • एकरकमी देय - संपूर्ण विमा रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला एकाच वेळी देण्यात येईल.
 • हप्ता पर्याय  - आपण विमा रकमेचा काही भाग एकरकमी आणि उर्वरित भाग 5, 10 किंवा 15 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये मिळण्याचा पर्याय देखील निवडू शकता. आपण आपल्या प्रियजनांसाठी नियमित रोख रकमेची सोय करू  इच्छित असल्यास हा पर्याय  उपयुक्त ठरू शकतो.
 
रायडर - जादा पैसे देऊन आपण अ‍ॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर निवडू शकता. अपघातामुळे मृत्यू झाल्यास आपल्याला योजनेतील विमाराशी व्यतिरिक्त राइडर विमाराशीचाही लाभ मिळेल.
 

एलआयसी जीवन अमर प्लॅनची ​​प्रीमियम तुलना 

ही तुलना आपल्याला एलआयसी आणि इतर कंपन्यांच्या योजनांच्या तुलनेत ह्या योजनेचे प्रीमियम किती आहे हे दर्शवते
 
विमा रक्कम  - 1 कोटी
पॉलिसीचा अवधी- 10 वर्षे
पॉलिसीधारकाचे वय - 40 वर्षे
धूम्रपान न करणारे,पुरुष
 
वार्षिक प्रीमियम करांसहखालीलप्रमाणे आहेतः
 
योजनेचे नाव वार्षिक प्रीमियम
एचडीएफसी लाइफ क्लिक 2 प्रोटेक्ट 3D प्लस रु. 11,166
आयसीआयसीआय प्रूडेंशियल आयप्रोटेक्ट स्मार्ट रु. 11,192
एलआयसी ई-टर्म प्लॅन रु. 17,464
एलआयसी जीवन अमर रु. 18,956
 
 
एलआयसी जीवन अमर ही  एक ऑफलाइन योजना आहे  जी ऑनलाइन  उपलब्ध असलेल्या एलआयसी ई-टर्म 
या योजनेच्या तुलनेत थोडा महाग पर्याय  आहे . 
 

एलआयसी जीवन अमर प्लॅनमधील फायदे

डेथ बेनिफिट
पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला विमा रक्कम दिली जाईल.
 
मॅच्युरिटी (परिपक्वता) बेनिफिट्स 
ही एक शुद्ध टर्म विमा योजना असल्याने परिपक्वतेचा कोणताही फायदा मिळणार नाही.

 

 एलआयसी जीवन अमर पॉलिसीमधील पात्रता अटी

  किमान कमाल
प्रवेश वय 18 वर्षे  (मागील वाढदिवसापर्यंत) 65 वर्षे (मागील वाढदिवसापर्यंत)
मॅच्युरिटी वय 28 वर्षे  (मागील वाढदिवसापर्यंत) 80 वर्षे (मागील वाढदिवसापर्यंत)
पॉलिसी अवधी 10 वर्षे 40 वर्षे
मूळ विमा रक्कम  रु. 25 लाख मर्यादा नाही 
प्रीमियम भरणा पर्याय नियमित प्रीमियम: पॉलिसीच्या अवधी एवढाच
मर्यादित प्रीमियम: पॉलिसी अवधी - ५ (पॉलिसी अवधी १० ते ४० वर्षांसाठी)
मर्यादित प्रीमियम: पॉलिसी अवधी - १० (पॉलिसी अवधी १० ते ४० वर्षांसाठी)
सिंगल प्रीमियम: सिंगल देय
कमाल  प्रीमियम नियमित प्रीमियम - रु. 3000 /-
सिंगल  प्रीमियम  - रु. 30000/-
 

एलआयसी जीवन अमर पॉलिसीची इतर वैशिष्ट्ये

आयकर सूट  - या योजनेत कलम 80 सी आणि कलम 10 (10 डी) अंतर्गत फायदे असतील. 
सरेंडर मूल्य - नियमित आणि मर्यादित वेतन पर्यायांतर्गत कोणतेही सरेंडर मूल्य उपलब्ध नाही  परंतु आपल्याला ते सिंगल पे पर्यायात उपलब्ध असेल.  
फ्री लुक पीरियड - पॉलिसीधारकास पॉलिसीच्या अटींविषयी खात्री नसल्यास ती पॉलिसी दस्तऐवज मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत रद्द करू शकता.
 
आपण  एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स  पॉलिसीबद्दल बरेच काही समजून घेतले. आपल्याकडे या योजनेवर अजून  काही प्रश्न असल्यास, खाली जरूर आम्हाला प्रश्न विचारा.  आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.

LIC Jeevan Amar Plan in Hindi > | LIC Jeevan Amar Plan in English >

Compare Term Plans

Leave a Comment

Term Insurance Calculator
Important: Insurance is the subject matter of solicitation | © 2009-2022 MyInsuranceClub.com