India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator
एलआयसी मनी बॅक पॉलिसी 20 वर्षे
views
views
एलआयसी मनी बॅक पॉलिसी - 20 वर्षे नियोजन
एलआयसी मनी बॅक पॉलिसी - 20 वर्षे ही साधी पैसा परत योजना किंवा अपेक्षित एंडॉवमेंट पॉलिसी आहे. ही नॉन-युनिट-लिंक्ड इन्शुरन्स योजना आहे जिथे पैसे पूर्व-निश्चित कालावधीच्या रूपात दिले जातात. या पॉलिसीमध्ये, जर विमा उतरला तर तो 5, 10 आणि 15 वर्षांच्या समाप्तीनंतर प्रत्येकवर्षी विमाराशीच्या 20% रक्कम मिळेल आणि उर्वरित विमाराशीच्या 40% रक्कम आणि अधिक जमा बोनस 20 वर्षांच्या समाप्तीनंतर पॉलिसी परिपक्व झाल्यावर मिळेल. तथापि, जर विमाधारक व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीत मृत्यू पावत असेल तर नामनिर्देशित व्यक्तीस आधी किती रक्कम मुदतीपूर्वी अदा करण्यात आली आहे याची पर्वा न करता संपूर्ण विमाराशी प्राप्त होईल आणि बोनसची संपूर्ण विमा राशीवर गणना केली जाईल आणि पॉलिसी मुदत संपुष्टात येईल.
एलआयसी मनी बॅक पॉलिसीची (20 वर्षे) मुख्य वैशिष्ट्ये
मृत्यू आणि सर्व्हायवल लाभांसह हा एक मनी बॅक प्लॅन आहे.
सरळ प्रत्यावर्ती बोनस पॉलिसी मुदतपूर्तीवर किंवा मुदती पूर्वीच्या मृत्यूवर देय आहे.
सर्व्हायवल बेनिफिट - 5, 10 आणि 15 वर्षांच्या समाप्तीनंतर प्रत्येकवर्षी विमाराशीच्या 20% रक्कम मिळेल आणि उर्वरित विमाराशीच्या 40% रक्कम आणि अधिक जमा बोनस 20 वर्षांच्या समाप्तीनंतर पॉलिसी परिपक्व झाल्यावर मिळेल.
राइडर्सद्वारे पर्यायी उच्च संरक्षण
COMPARE THIS PLAN WITH OTHER MONEY BACK PLANS
एलआयसी मनी बॅक (20 वर्षे) पॉलिसीतून मिळणारे फायदे
मृत्यू लाभ - लाइफ इन्शुअर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पूर्ण विमाराशी मिळते (जरी आधीच काही रक्कम दिली गेली असेल तरीही) + जमा झालेला बोनस
सर्व्हायवल लाभ - लाइफ इन्शुअर व्यक्तीस खालील सर्व्हायवल बेनिफिट मिळेल
पॉलिसी टर्म एकूण 20 वर्षे
सर्व्हायवल बेनिफिट
5 वर्षांच्या शेवटी
विमाराशीच्या 20%
10 वर्षांच्या शेवटी
विमाराशीच्या 20%
15 वर्षांच्या शेवटी
विमाराशीच्या 20%
परिपक्वता लाभ - पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी, विमाधारकांना जमा केलेल्या बाकी बोनससह उर्वरीत विमाराशीच्या 40% रक्कम मिळेल.
आयकर लाभ - लाइफ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत भरलेल्या प्रीमियम्सची कलम 80 सी अंतर्गत करातून सूट आहे आणि मॅच्युरिटी देय रक्कम कलम 10 (10 डी) अंतर्गत करमुक्त आहे.
एलआयसी मनी बॅक ( 20 वर्षे) पॉलिसीमध्ये पात्रता अटी आणि इतर निर्बंध
किमान
कमाल
विमा राशी (रुपये)
रु. 50,000
मर्यादा नाही
पॉलिसी मुदत (वर्षांमध्ये)
20
प्रीमियम पेमेंट टर्म (वर्षांमध्ये)
20
लाइफ इन्शुरन्सच्या प्रवेशाचे वय (वर्षांमध्ये)
13
50
मुदतपूर्तीचे वय
-
70
प्रीमियम (रू.)
निर्दिष्ट नाही
देयक पद्धत
वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक
एलआयसी मनी बॅक (20 वर्षे) पॉलिसीच्या प्रीमियमचे नमुना उदाहरण
खालील उदाहरणामध्ये निरोगी माणसाची (नॉन-तंबाखू उपभोक्त्याची) निवड केली आहे.
वय = 30 वर्षे, 35 वर्षे आणि 40 वर्षे, विमाराशी = रु. 1,00,000 पॉलिसी टर्म = 20 वर्षे
एलआयसी मनी बॅक (20 वर्षे) पॉलिसीची अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि लाभ
रायडर्स- या प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त रायडर आहेत
अपघाती मृत्यू बेनिफिट राइडर - रुपये 1000 विमा राशीच्या वर 1 रुपया
टर्म रायडर
गंभीर आजार रायडर
तर काय होते?
आपण प्रीमियम अदा करणे थांबवले - जर आपण 3 पॉलिसी वर्षानंतर प्रीमियम भरणे बंद केले तर, पॉलिसी कमी विमा राशीसाठी एक पेड अप मूल्य प्राप्त करते परंतु पॉलिसी भविष्यात कोणत्याही नियमित वाढीसाठी पात्र असेल.
आपण पॉलिसी परत करू इच्छित आहात - पॉलिसी वर्षानंतर गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आहे गॅरंटीड सरेंडर मूल्य = भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 30% - पहिल्या वर्षीचा प्रीमियम
आपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्ज हवे आहे - या पॉलिसीच्या अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध नाही