India's 1st IRDAI Approved Insurance Web Aggregator

प्रधान मंत्रीवय वंदना योजना

 •  views
 •  views

प्रधान मंत्री वय वंदना योजना सारांश

ही ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना १० वर्षांपर्यंत ८% परताव्याची हमी मिळेल.ही योजनाकरिता गुड्स आणि सेवा कर (जीएसटी) पासून सूट आहे.ही योजना लाँचच्या तारखेपासून / घोषित केलेल्या तारखेपासून एक वर्षासाठी उपलब्ध असेल.एलआयसीने आतापर्यंत ५८,१५२ पॉलिसी विकल्या आहेत. ४ मे २०१७ ला सॉफ्टलाँच झाल्यापासूनरु.२७०५कोटी गोळा केले आहेत.


हीयोजना ऑनलाइन तसेच ऑफलाइनही खरेदी करता येते.

योजना UIN 512G311V01 आहे.
 

प्रधान मंत्री वय वंदनायोजनेतील पात्रता अटी

  किमान कमाल
वय ६० वर्षे (पूर्ण) मर्यादा नाही
पॉलिसी टर्म १० वर्षे
निवृत्तीवेतनपदधत
(पेन्शन मोड)
मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक
खरेदी किंमत रु. १,४४,५७८ मासिक
रु. १,४७,६०१ तिमाहीसाठी
रु. १,४९,०६८ अर्धवर्षासाठी
रु .१,५०,००० वार्षिक
रु. ७,२२,८९२ मासिक
रु. ७,३८,००७ तिमाहीसाठी
रु. ७,४५,३४२ अर्धवर्षासाठी
रु. ७,५०,००० वार्षिक
निवृत्तीवेतन (पेन्शन) रक्कम रु. १,००० / - प्रति महिना
रु. ३,००० / - प्रति तिमाही
रु. ६,००० / - प्रति सहामाही
रु. १२,००० / - प्रति वर्ष
रु. ५,००० / - प्रति महिना
रु. १५,००० / -प्रति तिमाहीत
रु. ३०,००० / - प्रति सहामाही
रु. ६०,००० / - प्रति वर्ष


या प्लॅनमधील जास्तीत जास्त निवृत्तीवेतन/ पेन्शनची मापदंड संपूर्ण कुटुंबासाठी आहे.कुटुंबात निवृत्तीवेतनधारक, पतीपत्नी आणि अवलंबून असणाऱ्या मुलांचा (डिपेंडेंट)समावेश आहे.


निवृत्ती वेतन / पेन्शन देण्याची पद्धत:

पेन्शन / निवृत्तीवेतनपेमेंटच्या पद्धती मासिक, त्रैमासिक, अर्धवेळ आणि वार्षिक असतात.पेन्शन पेमेंट एनईएफटी किंवा आधार सक्षम पेमेंट सिस्टमद्वारे होईल.
 

प्रधान मंत्री वय वंदना योजनेचे फायदे

 • निवृत्ती वेतन / पेन्शनपेमेंट: 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीतपॉलिसीधारकाच्या हयातीत, खरेदीच्या वेळी पेन्शनधारकाने निवडलेल्या मासिक / तिमाही / सहामाही / वार्षिक पद्धतीने प्रत्येक कालावधीच्या शेवटी पेन्शन देय आहे.
यायोजनेंतर्गत गुंतवलेल्या प्रत्येकी रु. १,००० साठी
 1. रु. ८० मासिक पद्धतीने दिले जातील.
 2. रु. ८०.५ तिमाही पद्धतीने दिले जातील.
 3. रु. ८१.३ अर्धवार्षिक पद्धतीने दिले जातील.
 4. रु. ८३ वार्षिक पद्धतीने दिले जातील.
 • मृत्यू लाभ: 10 वर्षांच्या पॉलिसी मुदती दरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर,लाभार्थ्यासाठी खरेदी किंमत परत दिली जाईल.
 • मॅच्युरिटी बेनिफिट: पॉलिसी मुदतीच्या १० वर्षाच्या अखेरीपर्यंत पॉलिसीधारक हयात असल्यास, खरेदी किमतीसह अंतिम पेन्शनहफ्ता दिला जाईल.
 • सरेंडर मूल्य: ही योजना पॉलिसी मुदतीच्या दरम्यानअपवादात्मक परिस्थितीतपॉलिसी सोडण्याचीमान्यता देते. जसे कि निवृत्तीवेतनधारकासस्वतःच्या किंवा पती/पत्नीच्या कोणत्याही गंभीर / टर्मिनल आजाराच्या उपचारासाठी पैशाची आवश्यकता असू शकते. अश्या प्रकारामध्येदेय असणारे सरेंडर मूल्य हे खरेदी किंमतच्या ९८% असणे आवश्यक आहे.
 • कर्ज: 3 पॉलिसी वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. मंजूर करता येणाऱ्या कमाल म्हणजेच जास्तीत जास्त कर्जाची रक्कम ही खरेदी किमतीच्या ७५% असेल.
  आर्थिक वर्ष 2016-17 साठी, आकारण्यात येणारा लागू व्याज दर 10% (वार्षिक) आहे.
 • फ्री लूक पिरियड: पॉलिसीधारक पॉलिसीच्या "अटी व शर्ती" च्या बाबतीत समाधानी नसल्यास, तो / ती कार्पोरेशनकडे पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत (हीयोजना ऑनलाइन खरेदी केली असल्यास 30 दिवसात) मान्यनसलेल्या/ आक्षेपार्ह्य असलेल्याकारणांच्यायादिसाहितपॉलिसी परत करू शकेल. या प्रकरणात पॉलिसीधारकाला मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणिजर का देय केलेले पेन्शन असल्यास ते वगळून रक्कम मिळेल.
 • समाविष्ट/वर्ज्य नसलेले: या योजनेतून आत्महत्या वगळली जाणारनाही आणि असे कारण असल्यास पूर्ण खरेदी किमंत देय असेल.
 • कर सवलत: ही योजना खरेदी करण्यात किंवा या योजनेद्वारे मिळालेल्या पेन्शन रकमेवरकोणताही कर लाभ/सवलत नाही.
 

प्रधान मंत्री वय वंदना योजनेची उदाहरणे

काही उदाहरणांची मदत घेऊन ही योजना समजून घेऊ.
समजा, रमेशने खालील तपशीलांसह ही योजना घेतली आहे. पुढच्या 10 वर्षांसाठी निश्चित नियमित उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी त्याने आपल्या बचतीमधून एक एकरकमी गुंतवणूक केली.

वय – ६० वर्षे
खरेदीकिमंत– रु. ७,५०,००० /-
पॉलिसी मुदत – १०वर्षे
खरेदी वर्ष– २०१७
पेन्शनदेण्याची पद्धत– मासिक.

म्हणूनच प्रधानमंत्री वयवंदना योजनेत रमेश यांना मिळणारे लाभ खालील प्रमाणे असतील:


पेन्शन / निवृत्तीवेतन लाभ
रमेश यांनाप्रत्येक महिन्याच्या शेवटी १० वर्षांपर्यंतपेन्शन रकमेपोटीरु. ५,०००/- मिळतील.व्याज दर ८% असेल. तर ८% प्रमाणे  ७,५०,००० ला १२ ने भागून येणारी रक्कम त्याला दरमहा मिळेल. १० वर्षाच्या मुदतीनंतर जर का ते हयात असतील तरच ही रक्कम निश्चितपणे मिळू शकेल.

मॅच्युरिटी बेनिफिट
१० वर्षे पूर्ण झाल्यावर रमेश यांना खरेदी किमत मिळेल. ७,५०,००० जी त्याने योजना खरेदी करण्यासाठी दिली होती

मृत्यू लाभ
जर का रमेश यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले– वयाच्या६५ वर्षांपर्यंत त्याला मासिक पेन्शन मिळेल रु. ५०००/- आणि मृत्यू लाभार्थ मूळ खरेदीकिंमत जी आहे रु. ७,५०,०००/- त्याच्या नॉमिनीला मिळेल.हे १० वर्षांच्या पॉलिसी मुदतीच्या काळातकोणत्याही वेळी मृत्यू झाल्यास असेल.

सरेंडर मूल्य
समजा, रमेशचे वय ६८ वर्षे असताना, स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी रमेश यांना पैशांची गरज आहे.अशा परिस्थितीत, ६८ वर्षांपर्यंत त्याला महिन्याचे पेन्शन मिळेल रु. ५,०००/- आणिवयाच्या ६८ व्या वर्षी पॉलिसी परतघेतो तेव्हा त्याला खरेदी किंमतच्या ९८% परत मिळतील. उदा. ७,५०,००० च्या ९८% = रु. ७,३५,०००/-Read Review of  Pradhan Mantri Vaya Vandana Yojana in English >  |  Pradhan Mantri Vaya Vandana Yojana in Hindi >


 
Compare Pension Plans

Leave a Comment

Pension Plan Calculator
Important: Insurance is the subject matter of solicitation | © 2009-2022 MyInsuranceClub.com